मुख्य सामग्रीवर जा

Grampanchayat Makhajan

प्रगती आणि समृद्धीची वाटचाल

माझ भोके

आमच्या गावाची ओळख

माखजन हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेले एक गाव आहे. सुंदर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात वसलेले हे गाव त्याच्या धार्मिक स्थळांसाठी आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखले जाते. १) १ ऑगस्ट १८६३ रोजीची आदर्श माखजन मराठी शाळा लोकल बोर्ड ची शाळा म्हणून ओळख. २)विठ्ठल रुख्मिणी मंदिर हे पांडवकालीन मंदिर आहे. ३) माखजन बाजारपेठ हि ब्रिटीश कालीन आहे. ४) बाजारपेठीमध्ये मोठमोठ्या वकारी होत्या. ५)विठ्ठलराव लक्ष्मण रीळकर, विनय श्रीधर नातू, मुसा महमद मोडक – माजी आमदार संगमेश्वर-चिपळूण मतदारसंघ हे आदर्श शाळा माखजन मराठी या शाळेतील माजी विद्यार्थी आहेत. ६)माखजन मराठी या शाळेतील माजी विद्यार्थी वकील डॉक्टर, इंजिनीअर, पोलीस, उद्योजक, सी.ए. तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक पदापर्यंत पोहोचले आहेत. ७) ब्रिटीशकालीन १९३४ सालापासून ग्रॅव्हिटी नपापू योजना हि काष्टीलची असून आजपर्यंत सुस्थितीत चालू आहे. ८)डॉ. नेहा मंगेश दळी हिने फलोत्पादन - फुलशेती आणि लँडस्केपिंग यामध्ये मराठी भाषा आणि साहित्यात संशोधन- केंद्रित डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. ९)श्री.देव मारुती मंदिर हे इ.स.१६७० सालातील तानोजी आंग्रे यांच्या कारकिर्दीत या मंदिराची स्थापना झाली. ब्रम्हेंद्र स्वामी या मंदिरात आठ दिवस मुक्कामाला होते. १०)लोकसभेचे पहिले स्पीकर दादासाहेब मावळंगकर हे मावळंगे- माखजन असा प्रवास करत असताना डोलीने जात असत. ११)नामांकित वकील :- नानासाहेब साठे हे माखजन या गावचे आहेत. १२)सिद्धी जोहर व कान्होजी आंग्रे यांची लढाई माखजन गावात झाली होती. १३)सदाशिव राजाराम रानडे यांचे जयहिंद मोटार सर्व्हिस हे पंचक्रोशीत सर्वात मोठे मोटार सर्व्हिस होते. १४)अंकिता रामदास डेरे — गोगटे कॉलेज, रत्नागिरी येथून B.Sc. IT शिक्षण पूर्ण केले. MAH MCA CET परीक्षेत महाराष्ट्रात ९९ टक्के गुण मिळवून उत्तम रँक मिळवली. त्यानंतर VJTI कॉलेज, माटुंगा येथून MCA(Masters in Computer Applications) शिक्षण पूर्ण केले. सध्या थॉमस कुक इंडिया लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहे.

आधुनिक पायाभूत सुविधा - सिमेंट रस्ते, स्वच्छ पाणीपुरवठा
शैक्षणिक सुविधा - प्राथमिक व माध्यमिक शाळा
आरोग्य सेवा - प्राथमिक आरोग्य केंद्र

आमची दृष्टी

शाश्वत विकास, स्वच्छता, सुरक्षितता आणि सर्वसमावेशक प्रगती यांच्या बळावर आधुनिक आणि समृद्ध माखजन निर्माण करणे.

आमचे ध्येय

प्रत्येक कुटुंबापर्यंत सुविधा, प्रत्येक हाताला काम, आणि प्रत्येक मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे.

आमच्या यशोगाथा

उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार

जिल्हास्तरीय

स्वच्छता अभियान आणि पायाभूत सुविधा विकासासाठी

हरित गाव पुरस्कार

राज्यस्तरीय

वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनासाठी

डिजिटल इंडिया पुरस्कार

डिजिटल सेवा आणि ई-गव्हर्नन्ससाठी