कार्यक्रम
माखजनात गांडूळखत प्रकल्पासाठी प्रयत्न
--
29 December 2025
ग्रामपंचायत प्रशासन
3 वाचन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायत येथे,
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने शेतीशी संबंधित व शेतीपूरक कामाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांनी गांडूळ खत बेडची तयारी केली आहे. व गांडूळ खत निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
माखजन गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांनी एकत्र येत गांडूळ खत (Vermicompost) तयार करण्यासाठी बेड तयार केले या उपक्रमात गावचे सरपंच महेश बाष्टे व अन्य सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती
या उपक्रमाद्वारे महिलांनी जैविक शेतीला चालना देण्याचा संकल्प केला असून, घरगुती ओला कचरा व शेणखत याचा वापर करून सेंद्रिय गांडूळ खत निर्मिती केली जाणार आहे.
गावातील "प्रगती ग्रामसंघ" यांच्या पुढाकाराने व स्वयंप्रेरणेने हा उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी सरपंचांनी महिलांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, "महिलांचा सहभाग ही ग्रामविकासाची खरी ताकद आहे. जैविक खत निर्मितीमुळे उत्पन्न वाढीबरोबरच पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल."
या उपक्रमामुळे गावात सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन मिळणार असून महिलांना "स्वरोजगाराचाही मार्ग खुला होईल", असा विश्वास ग्रामपंचायत अधिकारी यांनी व्यक्त केला. तरी अशा उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन माखजन गावचे सरपंच श्री. महेश बाष्टे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन केले.