मुख्य सामग्रीवर जा
कार्यक्रम

माखजन येथे महिलांना हळदीकुंकू कार्यक्रमांतर्गत विशेष मार्गदर्शन

--
16 January 2026 ग्रामपंचायत प्रशासन 7 वाचन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायती तर्फे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने दिनांक १४ जानेवारी रोजी माखजन येथे सोलापशी मंदिर या ठिकाणी सध्याच्या काळात महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे उत्तम मार्गदर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन करण्यासाठी फ्रेशनेस्ट इनोव्हेशन अँड हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड ऐरोली, नवी मुंबई येथील स्वप्ना कदम, नंदू चव्हाण, सलोनी मोरे, तेजाली धूलप यांनी उपस्थित होत्या. राह उत्तम मार्गदर्शन केले. त्यानी उपस्थिताना मार्गदर्शन केले. माखजन गावचे सरपंच श्री. महेश बाष्टटे, ग्रामपंचायत सदस्य सौ. वैष्णवी चव्हाण, सौ. मीनाक्षी हेमण, ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रशांत रणखांब, प्रगती ग्रामसंघ पदाधिकारी सौ. संपदा हेमण, सौ. साक्षी तांबे, सौ. प्रिया घेवडे व सर्व बचत गट महिला उपस्थित होत्या.
शेअर करा: