मुख्य सामग्रीवर जा
सूचना

*⭕????माखजन एसटी बसस्थानकावर 'स्मार्ट कार्ड'ची सुविधा*

..
09 April 2026 ग्रामपंचायत प्रशासन 4 वाचन
*⭕????माखजन एसटी बसस्थानकावर 'स्मार्ट कार्ड'ची सुविधा*

*▪️संगमेश्वर दि ९ एप्रिल*

▪️रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता एसटी बसच्या सवलतीसाठी लागणारे NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड काढण्यासाठी प्रवाशांना रत्नागिरी किंवा चिपळूण जाण्याची गरज नाही. माखजन एसटी बसस्थानकावरच ही विशेष सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी प्रवाशांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच, नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि ओटीपी मिळवण्यासाठी जवळ चालू मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. एसटी प्रशासनाने स्पष्ट केल्यानुसार, या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून विविध प्रवर्गातील लोकांना प्रवासात सवलत मिळणार आहे.

▪️त्यात १२ ते ७५ वयोगटातील महिला, ७५ वर्षांवरील महिला आणि पुरुष, ६५ ते ७५ वयोगटातील पुरुष यांचा समावेश आहे.
भविष्यात सवलतीचा लाभ मिळवताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी पात्र प्रवाशांनी लवकरात लवकर आपले स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. माखजन परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शेअर करा: