कार्यक्रम
माखजन बस स्थानकाचे दुसरे सर्वेक्षण मूल्यमापन केले सिंधुदूर्ग विभागीय समितीने
--
27 July 2025
ग्रामपंचायत प्रशासन
2 वाचन
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील माखजन बस स्थानकाने आपली स्वच्छता व व्यवस्थापन क्षमता सिद्ध करून पहिल्या प्रेमासिक सर्वेक्षणात "क वर्ग " बस स्थानक म्हणून आपली उठावदार कामगिरी केली आहे.
▪️या अभियानांतर्गत एकूण चार त्रैमासिक सर्वेक्षण होणार असून दुसऱ्या त्रैमासिक सर्वेक्षणासाठी २५ जुलै २०२५ रोजी माखजन येथे सिंधुदुर्ग विभागीय समिती दाखल झाली होती.
▪️सदर सिंधुदुर्ग मूल्यमापन समितीमध्ये निलेश लाड विभागीय वाहतूक अधीक्षक, अमित कलकुटकी विभागीय कर्मचारी अधिकारी, लियाकत माखजनकर स्थानिक प्रवासी व समाजसेवक, श्रीकृष्ण खातू पत्रकार आधी सदस्य समितीने माखजन बस स्थानकाचे नियोजित व अधिकृत निकषानुसार मूल्यमापन करून गुणदान करून बंदिस्त करण्यात आले.
▪️येथील सरपंच महेश बाष्टे, माजी सरपंच उमेश डेरे, स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी वर्गाचे सहकार्य उत्तम असल्याने सदर मूल्यमापन समितीने माखजन बस स्थानका बाबत समाधान व्यक्त केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
▪️प्रवाशांना स्वच्छ, आरामदायी आणि आरोग्यदायी वातावरण पुरवण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रयत्न कौतुकास्पद असून जिल्ह्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेच्या दर्जात वाढ होत असून ही बाब प्रशंसनीय आहे.
▪️याप्रसंगी देवरुख आगार प्रमुख मृदुला जाधव, माखजन सरपंच महेश बाष्टे माजी सरपंच उमेश डेरे, समाजसेवक व प्रवासी लियाकत माखजनकर,, वाहतूक नियंत्रक अनिल चव्हाण, सुरेंद्र रहाटे,कार्यालयीन कर्मचारी सत्यवान माईन,संतोष वडिले येथील चालक, वाहक, ग्रामस्थ व प्रवासी उपस्थित होते.