मुख्य सामग्रीवर जा
कार्यक्रम

माखजनात मोफत आरोग्य तपासणी

--
25 November 2025 ग्रामपंचायत प्रशासन 1 वाचन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने पिरॅमल संस्थेमार्फत २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत माखजन ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

▪️या शिबिरात मधुमेह व उच्च रक्तदाब याची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. तरी सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन माखजन ग्रामपंबचायतिचे सरपंच महेश बाष्टे यांनी केले आहे.

▪️शिबिराला येताना मोबाईल नंबर व आधारकार्ड तसेच चालू असलेल्या औषधांचा तपशील आणणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
शेअर करा: